Congress Survey : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाला तिलांजली

211
Congress Survey : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाला तिलांजली

काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणामुळे शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला तिलांजली मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Congress Survey)

सगळ्यात कमी जागा उबाठाला

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्व प्रमुख पक्ष अंतर्गत सर्वेक्षण करत असतात. काँग्रेसनेही आपला सर्वेक्षण अहवाल तयार केला ज्यात महाविकास आघाडी सगळ्यात कमी जागा शिवसेना उबाठाला आणि सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

(हेही वाचा – ATS Raid Pune : पुण्यात एटीएसचा छापा; बनावट टेलिफोन एक्स्चेंजमधून ३ हजार ७८८ सीम कार्ड जप्त)

राष्ट्रवादीला ६०-६५

महाविकास आघाडीला विधानसभेच्या २८८ पैकी एकूण १७० ते १८५ जागा निवडून येतील. त्यात काँग्रेसच्या ८०-८५ असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ६०-६५ आणि सगळ्यात कमी म्हणजेच ३०-३५ जागा शिवसेना उबाठाला मिळतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. (Congress Survey)

मुख्यमंत्री पदाच्या चेहेऱ्याला प्रतिसाद नाही

गेले काही दिवस शिवसेना उबाठाने उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहेरा जाहीर करण्याचा आग्रह होत होता. उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडूनही ठाकरे यांना ‘मविआ’चा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा घोषित करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. अखेर उद्धव ठाकरे यांनी ‘मविआ’च्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहेऱ्याचा विषय काढला, मात्र दोन्ही काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

(हेही वाचा – Solapur Airport चे लवकरच ‘टेक ऑफ’)

प्रचारप्रमुख पदाची संधीदेखील हुकणार?

काँग्रेसने ‘ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री’ ही भूमिका कायम ठेवली. आता तर काँग्रेसच्या सर्वेक्षणात सर्वाधिक जागा पक्षाला मिळणार असल्याचा निष्कर्ष आल्याने मुख्यमंत्री पदाची स्वप्ने काँग्रेस नेत्यांनाच पडू लागली आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या स्वप्नांना तिलांजली मिळाल्यासारखेच आहे, अशी चर्चा सुरू झाली. ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आग्रहामुळे महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुख पदाची संधीदेखील ठाकरे गमावून बसले असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या मागे फरफटत जाण्याची वेळ

काँग्रेस सर्वेक्षणामुळे आता राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून शिवसेना उबाठाला जागावाटपातही त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तर उबाठाला आता काँग्रेसच्या मागे फरफटत जाण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया एका काँग्रेस कार्यकर्त्याने व्यक्त केली. (Congress Survey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.