मतमोजणीआधीच काँग्रेसचा रडीचा डाव

159

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. पण राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदानावर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून मतमोजणीआधीच भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजपच्या या दोन आमदारांची मतं बाद होणार का,याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दोन मतांवर आक्षेप

भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे गंभीररित्या आजारी असताना सुद्धा त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला हजेरी लावली. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुकही केले होते. पण आता या दोन मतांवरच काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. मुक्ता या व्हिलचेअरवर असल्यामुळे तसेच लक्ष्मण जगताप यांना चालताच येत नसल्यामुळे भाजपच्या इतर आमदारांनी त्यांना आधार देत मतदान कक्षापर्यंत नेले. त्यानंतर त्यांनी मतदान केलेली मतपत्रिका भाजपच्या इतर आमदारांनी मतपेटीत टाकल्यामुळे काँग्रेसकडून या दोघांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. अशाप्रकारे मतदान करण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती का, असा सवाल करत आता काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे.

(हेही वाचाः मतदान संपले आता निकालाची प्रतीक्षा! चमत्कार घडणार की आकडे जिंकणार?)

मविआचे खालच्या पातळीचे राजकारण

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांबाबत निवडणूक आयोगाकडून रितसर परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने घेतलेल्या या आक्षेपामध्ये कुठलेही तथ्य नसून, हा आक्षेप निवडणूक आयोगाकडून नक्कीच फेटाळण्यात येईल, असा विश्वास भाजपर आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच टिळक आणि जगताप हे दोघेही गंभीर आजारी असताना देखील त्यांनी मतदान करत लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावले. पण त्यांच्यावर असा आक्षेप घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडून खालच्या पातळीचे राजकारण करण्यात येत असल्याची टीकाही कुटे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.