मुंबई काँग्रेसने एकाच दगडात मारले दोन पक्षी!

शिवसेनेवर शरसंधान तर करायचंच पण भाजपालाही टार्गेट करून ठाकरे सरकारमधील आपला आघाडी धर्मही पाळण्याचा फंडा काँग्रेस जपतेय.

95

सध्या काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळत असताना काँग्रेस मोदी सरकारवर कायम टीका करते. परंतु, त्याच वेळी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कारभारावर आसूड उगारत शिवसेनेलाही लक्ष्य करत आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. अशा रीतीने काँग्रेसने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची झलक ट्विटरच्या माध्यमातून दाखवून दिली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेला विरोध! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमावर तोंडसूख घेत मुंबई काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमात सगळ्याच गोष्टी असत्य असतात, अशा आशयाचा उल्लेख मुंबई काँग्रेसच्या ट्विटरमध्ये करण्यात आला आहे. त्याच वेळी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवून ‘हे खड्डेही मोदींच्या ‘मन कि बात’ प्रमाणे असत्य ठरावेत, पण मुंबई महापालिका सुधारणार नाही’, असे म्हणत मुंबई काँग्रेसने शिवसेनेला शालीतून जोडे मारले आहेत. मुंबईतील खड्ड्यांसंदर्भात मीडियातील दोन बातम्या फोटेसहीत पोस्ट करत मुंबई काँग्रेसने सोशल मीडियावर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे.

(हेही वाचा : सायक्लॉन शेल्टर उभारणीत राज्य सरकारची हलगर्जी भोवली)

ट्विटरवर मुंबई काँग्रेस आक्रमक! 

अशा रीतीने महाराष्ट्र काँग्रेस एकाच वेळी दोन पक्षी मारण्याची कसब आत्मसात करत आहे. शिवसेनेवर शरसंधान तर करायचंच पण भाजपालाही टार्गेट करून ठाकरे सरकारमधील आपला आघाडी धर्मही पाळण्याचा फंडा काँग्रेस जपतेय. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, दिल्लीतून आलेल्या मेसेजनंतर प्रदेश नेतृत्त्व थंडावले असले, तरी मुंबई काँग्रेसने शिवसेनेवर तोफा डागणे कायम ठेवले आहे. भाई जगताप यांनी मुंबईतल्या प्रश्नांवरून सातत्याने मुंबई महापालिकेवर टीकास्त्र सोडली आहेत. आता सोशल मीडियावरूनही मुंबई काँग्रेस आक्रमक भूमिका घेत एकाच वेळी दोघांना अंगावर घेण्यास सुरुवात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.