चोरानेच दुसर्या माणसाला चोर म्हटलं तर कसं वाटेल? सध्या काँग्रेस पक्षाचं तसंच झालेलं आहे. तळीरामाने व्यसनमुक्तीवर जाहीर व्याख्यान द्यावे अशा थाटात कॉंग्रेस पक्ष वावरत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच विधान या प्रकारात मोडतं. नाना पटोले म्हणाले, “ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे.”
( हेही वाचा : मुंबईच्या रस्त्यांवर आजही सुमारे ४००हून अधिक खड्डे )
आता या विधानाचा विचार केला तर नाना पटोलेंना कदाचित आपल्या भूतकाळाचा विसर पडला आहे. फार मागे जायची गरज नाही. परंतु ठाकरे सरकारमध्ये कॉंग्रेस हा एक घटक होता आणि हे ठाकरे सरकार वसुली आणि दहशतीच्या जीवावर चालत होते हे स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरेंचा ओसामा बीन लादेन, वाझे यांनी जो पराक्रम केला त्याचा विसर पटोले यांना पडला आहे.
या महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या मनात दहशत पसरवली होती. आपल्या विरोधात बोललात तर तुमचं जगणं कठीण करु अशी कृतीतून धमकी दिली. कोरोनाचं संकट आलं असताना हे सरकार वसुली करण्यात गुंतलं होतं. कॉंग्रेस पक्षाचा इतिहास पाहता त्यांना शिख दंगलीचा देखील विसर पडला आहे. त्यांनी मुस्लिमांच्या मनात हिंदुंविषयी जे विष पेरलं आणि हिंदू मुस्लिम एकजूट कधीच होणार नाही याची काळजी घेतली.
टूलकीट प्रकरण सुद्धा ताजं आहे. सीएए एनआरसीच्या मुद्द्यावरुन झालेल्या दंगलींचं समर्थन कॉंग्रेसने केलं होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा मानसिक छळ त्यांनी केला होता. अशा अनेक घटना सांगता येतील ज्यावरुन हे स्पष्ट होतं की दहशतवाद हा कॉंग्रेसचा धंदा आहे. पण नाना पटोलेंची स्मृती तितकी चांगली नसावी. किंवा त्यांना त्यांच्या पक्षाने केलेल्या गोष्टी आठवत नसाव्यात. हा एक वेगळाच आजार म्हणावा लागेल. नाही का?
Join Our WhatsApp Community