काँग्रेसने निवडून आलेली ९० सरकारे पाडली; पंतप्रधानांचा घणाघात

123

देशात काँग्रेसने राज्यांची सरकारे पाडण्यासाठी कलम ३५६ चा वारंवार दुरुपयोग केला. काँग्रेसने राज्यातील सरकारे पाडण्यासाठी  ९० वेळा ३५६चा वापर केला आणि सरकारे पाडली. इंदिरा गांधी यांनी तर ५० वेळा कलम ३५६ चा वापर केला, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर पंतप्रधान मोदी बोलत होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

केरळात पहिल्यांदा डाव्यांचे सरकार निवडून आले होते. जे पंडित नेहरू यांना आवडत नव्हते, त्यांनी काही कालावधीतच ते सरकार पाडले. तमिळनाडूत एमजीआर आणि करुणानिधी यांचे सरकारही याच काँग्रेसवाल्यांनी पाडले. १९८५ मध्ये शरद पवार यांचे वय ४० वर्षे होते. एक तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघाला होता. त्यांचेही सरकार पाडले होते, आज ते काँग्रेसवाल्यांसोबत आहेत. एनटीआर जेव्हा उपचारासाठी परदेशात गेले, तेव्हा त्यांचेही सरकार या काँग्रेसने पाडले. काँग्रेसने राजभवनांचे पक्ष कार्यालय बनवले होते. वृत्तपत्रातील त्यावेळेच्या बातम्या वाचल्यावर लक्षात येते. २००५ मध्ये एनडीएकडे जास्त जागा होत्या. पण गव्हर्नरने युपीएला सरकार स्थापन करायला बोलावले होते. १९८२मध्ये हरियाणात भाजप आणि देवीलाल यांची निवडणूकपूर्व युती होती, तरीही राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले होते. ही काँग्रेसची पापे आहेत आणि आज देशाची दिशाभूल करण्याच्या गोष्टी करत आहात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा तुम्ही जितका चिखल फेकाल, तितके कमळ फुलेल; पंतप्रधानांचा विरोधकांना टोला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.