काँग्रेसची भारत जोडो यात्रा नाही, तर आग लगाओ यात्रा! संघाच्या गणवेशाचा अवमान, भाजपाचा पलटवार 

108

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. मात्र या यात्रेला सुरुवात होऊन ५ दिवस एक आठवडा होत नाही तोच या यात्रेवरून देशात एका मागोमाग एक वाद निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे केरळमध्ये वादग्रस्त पाद्री पोन्नीया यांच्याशी बोलताना पाद्री यांनी येशू हाच खरा देव आहे, असे वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर आता या यात्रेच्या संबंधी काँग्रेसने ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश जळत असलेले ट्विट करून वाद निर्माण केला आहे. त्यावर भाजपाने ही यात्रा भारत जोडो यात्रा नाही तर आग लगाओ यात्रा आहे, असे सांगत काँग्रेसवर पलटवार केला आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने एक ट्वीट जारी केले. काँग्रेसच्या यात्रेमुळे भाजपाला मोठे नुकसान भोगावे लागणार, असा इशारा दिला जातो.  त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील हाफ चड्डीचे एक छायाचित्र काँग्रेसने ट्विट केले आहे. या हाफचड्डीला आग लागल्याचे या ट्विटमध्ये दर्शवले आहे. तसेच आता फक्त 145 दिवस…असा इशाराही या ट्विटवर देण्यात आला आहे. या ट्विटवरून भाजपा नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू शकतात. उत्तर प्रदेशातील नेत्याने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा Gyanvapi Case Verdict : ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाने मुस्लिम पक्षकाराचा दावा फेटाळला! २२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी)

काँग्रेसचे ट्विट काय?

भाजप आणि आरएसएसने देशाचे केलेले नुकसान आणि तिरस्काराच्या भावनेतून मुक्त करण्यासाठी काँग्रेस एक-एक पाऊल पुढे टाकतेय… असे म्हणत काँग्रेसने संघाच्या हाफ चड्डीचा फोटो ट्विट केला आहे.

उत्तर प्रदेश मंत्र्याचे ट्विट काय?

काँग्रेसच्या या ट्विटवर उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद यांची प्रतिक्रिया आली आहे. राजकीय मतभेद स्वाभाविक आणि समजण्याजोगे आहेत. मात्र राजकीय विरोधकांना जाळण्यासाठी अशा प्रकारची मानसिकता काय कामाची? नकारात्मकता आणि द्वेषाच्या राजकारणाची सर्वांनीच निंदा केली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

(हेही वाचा हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.