संघाच्या गणवेशाला आग लावून रावणाला स्वतःची लंका जाळायची आहे का?

151

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमध्ये व्यग्र आहेत. ते अनेक लोकांना भेटत आहेत आणि फोटो सेशन करत आहेत. एका मुलीसोबतचा त्यांचा फोटो खूप व्हायरल झाला होता. राहुल गांधींचं वैशिष्ट्य असं आहे की ते हौशी राजकारणी आहेत. ते कधी नर्तक बनतात, कधी बॉडी बिल्डर बनतात, तर कधी राजीव गांधींप्रमाणे हेअर स्टाईल करतात. आता ते भारत जोडो यात्रेच्या मोडमध्ये आहेत.

( हेही वाचा : मुंबईतील आरोग्य यंत्रणा सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बंद होणाऱ्या प्रिन्स अली रुग्णालयाकडे कानाडोळा)

ही यात्रा कॉंग्रेसने केवळ राहुल गांधींना पुन्हा प्रमोट करायला काढली आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधींना अनेकदा प्रमोट करण्यात आलं. पण प्रत्येक वेळी जनतेने मतपेटीद्वारे त्यांना घरी बसण्याचाच सल्ला दिला. आता या भारत जोडो यात्रेत, तुकडे गॅंगचे कन्हैया कुमार देखील सामील झाले आहेत. कन्हैया कुमार आता कॉंग्रेसमध्ये आले आहेत.

संघ हा फिनिक्स पक्षाप्रमाणे

या यात्रेदरम्यान कॉंग्रेसने आपली खुनशी मानसिकता पुन्हा एकदा दाखवली आहे. कॉंग्रेसने ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जळणार्‍या पॅंटच्या व्हिडिओ पोस्ट केला. पुढे लिहिलं ‘145 days more to go’ याचा अर्थ काय होतो? तर १४५ दिवसांत संघाचा अंत होणार? म्हणजे ज्याप्रमाणे शिख हत्याकांड केलं, त्याप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करणार का? याचं स्पष्टीकरण कॉंग्रेसने द्यायला हवं.

राहुल गांधींनी इतिहासात डोकावून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांच्या पूर्वजांनी याआधीच संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण संघ वाढतच गेला आणि आज संघाचा स्वयंसेवक सर्वोच्च पदावर म्हणजे पंतप्रधान पदावर विराजमान आहे. संघाच्या गणवेशाला हात घालणं इतकं सोपं नाही. कॉंग्रेसने आपली खुनशी प्रवृत्ती दाखवून कॉंग्रेसची पॅंट जाळण्याचा प्रयत्न केला.

पण कॉंग्रेसला माहिती नाही की त्यांनी हनुमंताच्या शेपटीला आग लावली आहे. रावणाने हनुमंताच्या शेपटीला आग लावण्याचा प्रयत्न केला तर हनुमंताने त्याची लंका जाळून टाकली. त्यामुळे संघाची पॅंट जळली तरी राख होणार नाही. तर संघ हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. संघाने राखेतून भरारी घेतली आहे. कलियुगातल्या रावणाने हे लक्षात घ्यायला हवे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.