Congress-UBT Tussle : रामटेक बंडखोरीमागे काँग्रेस नेत्याचा ‘हात’: शिवसेना उबाठा

85
Congress-UBT Tussle : रामटेक बंडखोरीमागे काँग्रेस नेत्याचा ‘हात’: शिवसेना उबाठा
  • खास प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला काँग्रेस-उबाठामधील वाद विधानसभा निवडणुकीतही डोके वर काढत आहे. या जागेवर काँग्रेस-उबाठा एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी काम करण्याची शक्यता असून या मतदारसंघात एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली आहे आणि या बंडखोरीमागे काँग्रेस नेत्याचा हात आहे, असा थेट आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांसमोर केला. तर त्यांचा रोख हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा सुनील केदार यांच्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Congress-UBT Tussle)

उबाठात चलबिचल

रामटेक विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे) आशिष जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे विशाल बरबटे निवडणूक रिंगणात आहेत तर काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनीही बंडखोरी करत निवडणुकीत उडी घेतली. यामुळे उबाठामध्ये चलबिचल सुरू झाली भास्कर जाधव यांनी काँग्रेसविरुद्ध आवाज उठवला आहे. (Congress-UBT Tussle)

(हेही वाचा – Assembly Election च्या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातून ५३ गुंडांना करण्यात आले तडीपार)

बंडखोरीमागे काँग्रेस

माध्यमांशी बोलताना जाधव उघड नाराजी व्यक्त केली. “राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केलीय आणि त्यांच्यावर कारवाई करणे ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी आहे. मुळक यांच्या बंडखोरीमागे इथल्या काँग्रेस नेत्याचा हात आहे,” असा आरोप त्यांनी नाना पटोले किंवा सुनील केदार यांच्यापैकी कुणाचेही नाव न घेता केला. (Congress-UBT Tussle)

उबाठाने गांभीर्याने घ्यावे

जाधव म्हणाले की “आम्ही लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे आमच्या तरुण कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्याबदल्यात पूर्व विदर्भातील केवळ एक जागा आम्हाला मिळाली आणि त्या जागेवरही काँग्रेसने बंडखोरी केली. त्यामुळे हा बंडखोरीचा विषय आमच्या पक्षाने गांभीर्याने घ्यावा. काँग्रेसकडून अशा प्रकारचं वर्तन सातत्याने होत आहे. मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणे योग्य नाही,” अशा शब्दांत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला. (Congress-UBT Tussle)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.