विधानसभा निवडणुकीत Congress ‘या’ पाच आमदारांचा पत्ता करणार कट

220

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वॉटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. क्रॉस वॉटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांचा विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत यांना तिकीट मिळणार नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत पाच आमदारांना तिकीट देऊ नका असे आदेश काँग्रेस (Congress) हायकमांडने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर त्या आमदारांच्या ५ मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे.

(हेही वाचा Kolkata Doctor Rape Case प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारला झापले)

कोण आहेत ‘ते’ पाच आमदार?

  • सुलभा खोडके – अमरावती
  • झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व
  • हिरामन खोसकर – इगतपुरी
  • जितेश अंतापूरकर – नांदेड दक्षिण
  • मोहन हंबर्डे – देगलूर

यापैकी सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी व हिरामन खोसकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जातील तर जितेश अंतापूरकर व मोहन हंबर्डे अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपाकडे जातील असे दिसते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.