महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच सत्ता बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वकीयांचा रोषाला नेहमीच सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना लवकरच नारळ देण्यात येणार असून नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी सुरु झाल्याचे कळते. पक्षातील सर्वाना एकत्र सोबत घेऊन चालणारा आणि निवडणुकांचा विचार करता सर्व मान्यता असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात येणार असल्याचे कळते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट झाली. त्यावेळी राज्यातील परिस्थिती सोबतच काँग्रेस पक्षासमोरील आवाहन वर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी रमेश चेन्ननीथला यांच्या अहवालाची दखल घेऊन महाराष्ट्र बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची तयारी केली आहे.
(हेही वाचा Aurangzeb : औरंगजेब आणि मविआचा डीएनए एकच; चित्रा वाघ यांचा घणाघात )
या अहवालामध्ये अशोक चव्हाण, बंटी पाटील तसेच यशोमती ठाकूर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. यानुसार पाटील आणि ठाकूर सध्यातरी महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्याचे नेतृत्व सध्या तरी करण्यास सक्षम नाही. यामुळे पक्षाला एखाद्या ज्येष्ठ नेत्याची गरज आहे. अहवालात चव्हाण यांच्या नावाबाबत सल्ला देण्यात आला आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असून प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. शिवाय संघटना चालवीण्याचा अनुभव आहे. सर्वासोबत सोबत चर्चा झाल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
Join Our WhatsApp Community