- प्रतिनिधी
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षामुळे काँग्रेसला (Congress) सत्ता गमवावी लागली आहे. यामुळे काँग्रेसच्या तळपायातील आग मस्तकात गेली असून अरविंद केजरीवाल यांना धडा शिकविण्यासाठी दिल्लीत यात्रा काढली जाणार आहे. यामुळे इंडी आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आले की काय?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) प्रचार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसतर्फे दिल्ली जोडो यात्रा काढण्यात येत आहे. २३ ऑक्टोबरपासूनही यात्रा सुरू होणार आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी – वाड्रा आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा या यात्रेत सहभाग असणार आहे. मुळात, हरियाणाच्या निवडणुकीत ‘आप’मुळे आपला पराभव झाला असे काँग्रेसला वाटत आहे. केजरीवाल यांनी स्वतंत्र उमेदवार उतरविले नसते तर मतांचे विभाजन झाले नसते आणि काँग्रेस सत्तेत आली असती. मात्र आपच्या अडमुठेपणामुळे काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही.
(हेही वाचा – Thook Jihad : मसूरीत नौशाद आणि हसन अलीचा विकृत ‘थुंक जिहाद’, पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ)
आता काँग्रेसने (Congress) केजरीवाल यांना धडा शिकविण्याची योजना आखली आहे. दिल्लीतील मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसची ही मोठी खेळी मानली जात आहे. तसेच आप मुळे काँग्रेसला हरियाणामध्ये मोठा फटका बसला आहे. यामुळे ही यात्रा आप ला तिची जागा दाखविण्यासाठी काढली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चार टप्प्यात ही यात्रा असून पहिला टप्पा २३ ते २८ ऑक्टोबर, दुसरा टप्पा ४ ते १० नोव्हेंबर, तिसरा टप्पा १२ ते १८ नोव्हेंबर आणि चौथा आणि शेवटचा टप्पा २८ नोव्हेंबरपर्यंत आहे.
भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचा (Congress) जनाधार कमी झाला आहे, परंतु यावेळी पक्ष आपले जुने गड पुन्हा मिळवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community