स्त्रियांनो, तणावापासून मुक्तीसाठी दोन पेग पिऊन झोपा! काँग्रेसच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला

सिंघोला गावातील महिला त्यांना भेडसावत असलेल्या समस्या मंत्री अनिला भेडिया यांच्यासमोर चर्चासत्राच्या दरम्यान मांडत होत्या.

153

एकीकडे छत्तीसगडमध्ये भूपेश यांचे कॉंग्रेस सरकार निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी दारुबंदीच्या तयारीत आहे, तर, दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेसच्या दारुबंदीच्या अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सिंघोला गावातील महिला त्यांना भेडसावत असलेल्या समस्या मंत्री अनिला भेडिया यांच्यासमोर चर्चासत्राच्या दरम्यान मांडत होत्या. यावेळी महिलांनी दैनंदिन जीवन संघर्षमय बनत चालले आहे. आर्थिक, सामाजिक समस्यांनी आम्ही अस्वस्थ आहोत. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विरोधाभास अनुभवायला मिळत आहे असे म्हणाल्या. यावर ‘तणावमुक्त राहण्यासाठी थोड़ी-थोड़ी दारु पित जा आणि झोपत जा’, असा धक्कादायक सल्ला मंत्री अनिला भेडिया यांनी दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होऊन, नवा वादंग निर्माण झाला आहे. या वक्तव्याने छत्तीसगडमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

(हेही वाचा : माझ्या आग्रहाने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री! फडणवीसांच्या आरोपाचा पवारांनी केला खुलासा)

मंत्री अनिला भेडिया यांचे स्पष्टीकरण

स्त्रियांच्या समस्या ऐकून मी पुरूषांना थोडी पिऊन झोपा, असा सल्ला दिला होता. माझ्या विधानाचा राजकीय विपर्यास करून ते तोडून मोडून वापरण्यात आले, पुरूष कमी दारू पित असतील, तर घरात शांतता नांदून स्त्रिया तणावमुक्त राहतील, असे स्पष्टीकरण मंत्री अनिला भेडिया यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.