कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात कोल्हापूरच्या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी फडणवीस आणि मोदींवर टीका केली. त्यांनी महात्मा गांधींचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “महात्मा गांधी यांनी जो अहिंसेचा विचार दिला, त्यामुळे देशात लोकशाही टिकली आहे.” कॉंग्रेसच्या प्रत्येक नेत्याला असं का वाटत असेल की त्यांनी स्वातंत्र्य लढाईत सहभाग घेतला आहे.
मुळात लोकशाही टिकली ती भारतात बहुसंख्य हिंदू असल्यामुळे. जर इथे हिंदू अल्पसंख्यांक असते तर भारताचा अफगाणिस्तान झाला असता. महात्मा गाधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान कुणीही नाकारत नाही. पण त्याचा आजच्या कॉंग्रेसशी काय संबंध?
राहुल गांधींना जनतेने नाकारले
“भारत सध्या कठीण परिस्थितीतून जातोय, आम्ही इंग्रजांविरोधात लढलो आहोत, घाबरणार नाही यांच्याविरोधात देखील आम्ही लढू”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. बाळासाहेबांना वाटतं की भारतीय जनता मूर्ख आहे. त्यांना राहुल गांधी त्यांचे नेते वाटतात. तर याच राहुल गांधींना भारतातील बहुसंख्य जनतेने अक्षरशः नाकारले आहे. जिथे जिथे राहुल गांधी गेले तिथे तिथे कॉंग्रेसचा दारुण व लाजिरवाणा पराभव झालेला आहे.
याचे उत्तर आहे का?
याचा अर्थ राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या मार्गावरुन चालत नाहीत, असं बहुसंख्य भारतीय जनतेला वाटतं. महात्मा गांधींच्या मागे देश गेला होता असं कॉंग्रेसला वाटतं आणि त्यांना असंही वाटतं की त्याच स्वातंत्र्य लढाईत सहभागी झालेल्या कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी आहेत. मग राहुल गांधींना जनतेने का नाकारले याचे उत्तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे का?
आत्मपरिक्षण करावं लागेल
स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात चले जाओ आंदोलन केले होते. आता असंच आंदोलन जनता स्वेच्छेने कॉंग्रेसच्या विरोधात करत आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेसचा पराभव होत आहे, याचा अर्थ जनता कॉंग्रेसला चले जाओ म्हणत आहे. याचा गांभीर्याने विचार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नि समजुतदार राजकारण्यांनी करायलाच हवा. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज होते तसेच आता स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस झाले आहेत. याचं मूळ गांधी कुटुंबात आहे का? जनता गांधींवर रागावली आहे का? याचं आत्मपरिक्षण त्यांना करावं लागेल.
Join Our WhatsApp Community