Manmohan Singh : काँग्रेसच्या उलट्या बोंबा!

107
Manmohan Singh : काँग्रेसच्या उलट्या बोंबा!
Manmohan Singh : काँग्रेसच्या उलट्या बोंबा!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

२६ डिसेंबर २०२४ रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचे निधन झाले आणि कोणत्याही विषयात राजकारण करण्याची खुमखुमी असलेल्या कॉंग्रेसला या विषयातही राजकारण करण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणे भाजपा सरकारने मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचा अपमान केला. निगमबोध घाट येथे मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कॉंग्रेसचे म्हणणे असे आहे की त्यांच्यासाठी वेगळी जागा निवडण्यात आली नाही आणि त्यांच्या स्मारकासाठी जागाही दिली नाही. खरं पाहता कॉंग्रेस खोटारडापणा करत आहे. जे. पी. नड्डा म्हणाले की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी डॉ. सिंह यांच्या स्मारकासाठी जागा घोषित केलेली आहे आणि मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या कुटुंबाशी याबाबत बोलणे देखील झाले आहे.’ मात्र कॉंग्रेसला डॉ. सिंह यांच्याविषयी कोणतीही आपुलकी नसून त्यांना केवळ राजकारण करुन देशात संभ्रम निर्माण करायचा आहे.

(हेही वाचा – Naxalite Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, 1 जवान हुतात्मा)

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी एका पॉडकास्टमध्ये काँग्रेसमध्ये गांधी कुटुंब इतरांना कशा प्रकारे वागणूक देतं हे सांगितलं होतं. इतर नेत्यांना गांधींच्या घराच्या व्हरांड्यातंच थांबवलं जातं. घराच्या आत येण्यास परवानगी नसते. इतका भेदभाव केला जातो. सोनिया गांधींना देशभरातून विरोध झाला म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. बरं ते पंतप्रधान असताना सोनिया गांधी सुपर पीएम का झाल्या? त्यांना कोणी अधिकार दिला असंवैधानिक पद तयार करण्याचा? हा मनमोहन सिंहांचा व त्यांच्या उच्च शिक्षणाचा, कर्तृत्वाचा अपमान नव्हता का? राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा अध्यादेश फाडून फालतू स्टंट केला तेव्हा मनमोहन सिंहांचा अपमान झाला नाही का? डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्याबद्दल कॉंग्रेसला विशेषतः सोनिया गांधी व राहुल गांधी या मायलेकांना शून्य आदर आहे. कॉंग्रेस पक्ष हा त्यांच्या मालकीचा आहे, अशी त्यांची समज आहे आणि त्याचप्रकारे ते इतरांना वागणूक देत असतात. जर आज मल्लिकार्जून खरगे हे कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत तर सामान्य खासदार असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रमुख नेते असल्यासारखे का वावरत आहेत? सगळी आंदोलने त्यांच्याभोवती का फिरत आहे? सगळे निर्णय सोनिया-राहुल का घेत आहेत? याचं उत्तर आहे का या ड्युप्लिकेट गांधींकडे?

(हेही वाचा – Google च्या CEO ला किती असतो पगार? वाचून व्हाल थक्क!)

दुसरी गोष्ट पी. व्ही. नरसिंहराव यांना कॉंग्रेसने कशी वागणूक दिली होती? २३ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले. मात्र त्यांचे पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयात ठेवण्यासाठी जागा दिली नाही. त्यांचे अंतिम संस्कार हैरदराबाद येथे करण्यात आले. राव यांचे स्मारक बांधण्याचेही कष्ट या गांधी कुटुंबाने घेतले नाही. जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाले तेव्हा २०१५ मध्ये नरसिंह राव यांचे स्मारक बांधण्यात आले. जेव्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे २०२० मध्ये तेव्हा कॉंग्रेस कार्यकारणी समितीने शोकसभेचे आयोजन केले नव्हते. कॉंग्रेसच्या काळात अनेक योजना आल्या त्यातील अधिकतम ड्युप्लिकेट गांधी-नेहरू कुटुंबाच्या नावावरुन आहेत. असे कोण मोठे लागून गेले आहेत हे? यांच्याशिवाय देशात किंवा कॉंग्रेसमध्ये दुसरे कुणीच महान नव्हते का? इतरांचा अपमान करण्यात पीएचडी मिळवलेल्या कॉंग्रेसने इतरांना अक्कल शिकवावी? विद्यमान सरकारने डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचा सन्मानच केला आहे. पण आपलं स्वस्त ड्युप्लिकेट गांधी कुटुंबाला विकलेल्या कॉंग्रेसला हे कोण समजावणार. स्वतः कोरडे पाषाण असून इतरांना ब्रह्मज्ञान देणारी कॉंग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! नव्हे नव्हे, खरेतर, काँग्रेसच्या उलट्या बोंबा…

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.