Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांचा अवमान, आता पुतळाही फोडला

217

फादर बोल्मेक्स यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद शांत होत असतानाच आता करासवाडा-म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील संशयितांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे. गोव्यात Goa वारंवार हिंदूंचे श्रद्धास्थान, राष्ट्रपुरुष यांची विटबंना करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे गोव्यातही मणिपूर घडवण्याचे षडयंत्र आहे का, अशी शंका आता येऊ लागली आहे.

शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

गतवर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर करासवाडा टाकी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता. रविवारी, १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञातांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली. याची माहिती स्थानिक शिवप्रेमींना सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी समजातच ते पुतळ्याच्या ठिकाणी जमले. याबाबत शिवप्रेमींनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे. आम्हाला अजिबात कायदा हातात घ्यायचा नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसे न झाल्यास मात्र आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया शिवप्रेमींनी दिली.

(हेही वाचा ‘जाणता राजा’च्या व्यासपीठावर एकत्र आले छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचे वंशज )

गतवर्षी पुतळ्याची प्रतिष्ठापना करीत असताना काही जणांनी विरोध केलेला होता. आम्हाला भीती दाखवण्याचाही प्रयत्न झालेला होता. पण, आम्ही सर्वांनी संघटित होऊन धर्म आणि गोव्याच्या Goa रक्षणासाठी काम केलेल्या शिवरायांचा पुतळा करासवाड्यात बसवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्याची अशाप्रकारची विटंबना आम्ही कदापि सहन करणार नाही, असेही शिवप्रेमींनी नमूद केले.

रविवारी कारसवाडा, म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. ही बाब गंभीर असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. कळंगुट पंचायतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडण्याचे आदेश, फादर बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने जातीय तेढ निर्माण झाल्याच्या घटना गेल्या दोन महिन्यांपासून घडल्या असून ही घटना घडली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे दोन समुदायांमध्ये वैर निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. करसवाडा, म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर अटक करा आणि जातीय सलोखा बिघडवून कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती 

फादर बोलमॅक्स परेरा यांनीही केलेला शिवरायांचा अवमान  

याआधी गोव्यात Goa शिवरायांचा अवमान झाला होता. फादर बोलमॅक्स परेरा हे एसएफसी चर्च चिखली येथे बोलताना त्यांनी शिवरायांचा अवमान केला होता. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वत्र व्हायरल झाला. छत्रपती शिवाजी देव झालेत, पण शिवाजी महाराज देव नाहीत. शिवाजी राष्ट्रीय हिरो आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे. या राज्यासाठी त्यांनी केलं त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केलं आहे. खरेच हिंदू खतरे में है, असे मी पुन्हा म्हणतो. आपण हिंदूंना विचारायला हवे की छत्रपती शिवाजी महाराज तुमचा देव? तर ते देव नाहीत राष्ट्रीय हिरो आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य परेरा यांनी केले होते. त्यानंतर याप्रकरणी गोव्यात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर फादर बोलमॅक्स परेरा यांनी माफी मागितली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.