-
सुजित महामुलकर
एकीकडे काँग्रेस (Congress), शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षांतील दिग्गज नेत्यांची महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) रिघ लागली असताना महायुतीचे (Mahayuti) जुने घटक पक्ष नाराज होऊन दुरावत असल्याचे दिसून येत आहे. महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) लोकसभा (Lok Sabha) निवडणूक स्वतंत्र (independent) लढवण्याच्या तयारीत असून पक्षाने काही उमेदवारांची घोषणादेखील केली आहे. (Mahayuti)
जुन्या सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष
जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा ४० आमदारांचा एक गट बाहेर पडून भाजपसोबत आला आणि महाविकस आघाडी सरकार उलथवले. त्यानंतर वर्षभरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आणि जवळपास ४२ आमदारांसह अजित पवारही भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असे मजबूत सरकार राज्यात असल्याने भाजपचे आपल्या जुन्या सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले का? असा सवाल केला जात आहे. (Mahayuti)
(हेही वाचा – BJP Maharashtra Politics : काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी, राजेंद्र नरवणकर हे भाजपच्या गळाला)
बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची अपेक्षा सोडली
रासपचे प्रमुख आणि धनगर (Dhangar) समाजाचे नेते जानकर तसेच बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा प्रहार जनशक्ती (Prahar Janashakti) हे महायुतीचे मित्र, घटकपक्ष दुरावले गेले असल्याचे स्पष्ट झाले. जानकर हे भाजपसोबत होते तर कडू यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा महाविकस आघाडीतील मंत्रिपद सोडून शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर कडू यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत असताना महायुतीत मोठ्या नेत्यांच्या आयातीमुळे त्यांचे मंत्रिपद मागे पडले. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आता तर त्यांनीही पदाची अपेक्षा सोडली असल्याचे दिसते. (Mahayuti)
रासप स्वतंत्र निवडणूक लढणार
महादेव जानकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना जानकर यांनी नाराजी बोलून दाखवली. आम्हाला सत्तेत वाटा तिला नाही. आता तर विचारतही नाहीत. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.” महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा विचार आहे का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की “महाविकास आघाडीकडून अद्याप विचारणा केली नाही आणि आपणही त्यांच्याशी संपर्क साधला नाही.” (Mahayuti)
(हेही वाचा – MLA Disqualification Case : उबाठा गटाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालय लवकरच नवीन तारीख देणार)
जानकर परभणी आणि माढातून लढणार
सांगितले की ते स्वतः माढा आणि परभणी या दोन मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार असून रासप राज्यातील सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. “सांगलीमधून कालिदास गाढवे, नगरमधून रवींद्र कोठारी तसेच मध्य प्रदेशमधून २२ जागा, उत्तर प्रदेशमध्ये ७१, गुजरातमध्ये ६, कर्नाटकात १२ आणि गोवा राज्यात एक जागा लढवणार आहे.” (Mahayuti)
धनगर समाजाचे नेतृत्व
राज्यात मराठाबरोबरच धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणावर असून जानकर धनगर समाजाच्या एका मोठ्या गटाचे नेतृत्व करतात. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये जानकर यांना मंत्रिपद देण्यात आले होते. राज्यात सद्या रासपचा एक आमदार असला तरी मतविभागणी झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. (Mahayuti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community