‘संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही’; वाचा सविस्तर Amit Shah काय म्हणाले?  

अमित शाह म्हणाले की, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारांना वटणीवर आणण्याचे काम केले.

183
Lok Sabha Election 2024: काँग्रेस ४० पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, अमित शहांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल

राज्यात लोकसभेच्या (Lok sabha Election 2024) पाच टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून, देशभरात उर्वरित दोन टप्प्यातील निवडणुका अजून बाकी आहेत. त्यातील ६व्या टप्प्यातील निवडणुक येत्या २५ मे रोजी होणार आहे. त्यामुळे प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरक्षणाचा मुद्दा मांडला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुस्लिमांवर मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नाही. भाजपा (BJP) धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणार आहे.” यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. (Amit Shah)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पीओकेवर बोलताना इंडि आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरली!)

अमित शाहनी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधील जनतेला संबोधित केले, यावेळी राहुल गांधींवर निशाणा साधला, “राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणायचे की, कलम ३७० (Act 370) हटवले तर रक्ताच्या नद्या वाहतील. राहुलजी, ही तुमच्या आजीचा काळ नाही. आता तिकडे एक खडाही उचलला जात नाही.” अशा कडक शब्दात अमित शाहनी पलटवार केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी राज्यातील गुन्हेगारांना वटणीवर आणण्याचे काम केले. आधी राज्यात देशी बंदुका बनवल्या जायच्या, आज ब्रह्मोस क्षेपणास्त्र बनवले जातात. इथे बनवलेले तोफगोळे एखाद्या दिवशी पाकिस्तानवरही पडू शकतात. असे विधान अमित शाह यांनी केले. 

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : अमेरिकेचा टी-२० स्पर्धेत बांगलादेशला दे धक्का )

अमित शाह पुढे म्हणाले की, “पाच टप्प्यातील निवडणुका संपल्या आहेत. मोदीजींनी या पाच टप्प्यात ३१० जागांचा टप्पा पार केला आहे. इंडि आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. यावेळी काँग्रेसला ४० जागांचा आकडाही पार करता येणार नाही आणि अखिलेश यादव तर ४ जागाही जिंकू शकत नाही,” असा टोलाही अमित शाह यांनी यावेळी लगावला. (Amit Shah) 

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.