मुंबईतील बनावट नकाशे दाखवून बांधकाम परवानग्या मिळविलेली बांधकामे निष्कासित करावीत ; Chandrashekhar Bawankule यांचे निर्देश

मुंबईतील बनावट नकाशे दाखवून बांधकाम परवानग्या मिळविलेली बांधकामे निष्कासित करावीत ; Chandrashekhar Bawankule यांचे निर्देश

97
वाळूचे अवैध उत्खनन आणि साठेबाजी करणारे एसडीओ, तहसीलदार निलंबित; Chandrashekhar Bawankule यांचा अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळविलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटी द्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले.

हेही वाचा-MP News: विहिर साफ करायला उतरलेल्या 8 कामगारांचा गाळात अडकून दुर्दैवी मृत्यू !

याबाबत विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार सर्वश्री योगेश सागर, सुनील शिंदे बैठकीस प्रत्यक्ष तर ॲड. अनिल परब, सचिन अहिर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, ऑनलाईन उपस्थित होते. (Chandrashekhar Bawankule)

हेही वाचा- बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवलं जातयं; Piyush Goyal यांचे विधान

आयुक्त गगराणी यांनी याबाबत माहिती देताना बांधकाम परवानगी ऑनलाईन दिली जात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या परवानगीच्या आधारे केलेली बांधकामे ही अनधिकृत ठरतात, अशी ४५७ बांधकामे असून त्यापैकी ६६ प्रकरणी कारवाई करण्यात आली असून इतरांना नोटीस देण्यात येईल. त्याचप्रमाणे एसआयटी कडे देखील तक्रार दाखल करण्यात येईल. एसआयटीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशी नुसार २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एसआयटीमार्फत देण्यात आली. बावनकुळे यांनी महानगरपालिकेमार्फत जुलै महिन्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना यावेळी केली. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.