काँग्रेसच्या अधिकृत ट्विटवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे ट्विट केल्यावर त्यांचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेण्यात आला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी नुकतेच ब्रिटनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी भारताचा अवमान होईल अशी वक्तव्ये केली. याचे संसदेत तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या खासदारांनी तर राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसही राहुल गांधी यांच्या घरी गेले होते. अशा परिस्थितीत काँग्रेसने राहुल गांधी यांचा गाडी चालवतानाचा फोटो व्हायरल केला ज्यात वीर सावरकर यांचा अवमान केला.
काँग्रेसच्या या खोडसाळपणाचा भाजपच्या नेत्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी, ‘सावरकर समझा क्या…नाम- राहुल गांधी है…ओळख राष्ट्रीय पप्पू आहे. आपला शेंबूड पक्षाच्या नेत्यांना लावण्याचा छंद आहे. चीनचे एजंट आहे. बँकॉकमध्ये जातात मिमिक्री आर्टिस्ट आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है… पहचान राष्ट्रीय पप्पू है. अपना शेंबुड पार्टी के नेताओ को लगाने का शौक रखते है. चीन के एजंट है. बॅंकाक मे जाते रहते है. ठर्की मिजाज के मिमिक्री आर्टिस्ट है. pic.twitter.com/0cQMHFyFh4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2023
तर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत, ‘कृपया महान व्यक्तिमत्व वीर सावरकर यांचा अवमान करू नये, हात जोडून विनंती करतो’, असे म्हटले.
Join Our WhatsApp Communityकृपया महान आत्मा वीर सावरकर का अपमान न करें। हाथ जोड़कर विनती कर रहा हूं🙏 pic.twitter.com/sjAzRRQ3N5
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 19, 2023