मुंबईतील ऑक्सिजन प्लांटचे कंत्राट दुप्पट दराने! भाजपची चौकशीची मागणी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहर उपनगरात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पारदर्शी नसल्याचा भाजपचा आरोप आहे.

96

ऑक्सिजन प्लांट उभारणीमध्ये वसई-विरार महानगर पालिकेने मागवलेल्या दरापेक्षा मुंबई महापालिका दुप्पट दराने याची उभारणी करत असल्याची बाब निदर्शनास आणून देत या प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता भाजपचे मुबई महापालिकेचे पक्षनेता विनोद मिश्रा यांनी वर्तवली. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली असल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहर उपनगरात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पारदर्शी नसून यासारख्याच प्रकल्पासाठी वसई-विरार महानगरपालिकेने काढलेल्या निविदेपेक्षा बृहन्मुंबई महापालिका दुप्पट अधिक खर्च करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी महानगरपालिका आयुक्तांनी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.

(हेही वाचा : मुंबईतील नालेसफाई कामांची महापौरांकडून पहाणी)

महापालिकेची निविदा संशयास्पद 

ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी सर्व पातळ्यावर स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. त्याचाच भाग म्हणून वसई-विरार महानगरपालिकेनेही निविदा प्रक्रिया काढल्या आहेत. यातील टेक्नोमेट निविदाकाराचा दर हे मुंबई महानगरपालिका प्रशासनातील निविदा प्रक्रियेतील दरांच्या तुलनेत कमी आहे. त्याच ऑक्सिजन प्लांट उभारणी प्रकल्पाकरिता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दुप्पट अधिक खर्च करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

ऑक्सिजननिर्मिती तातडीने युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे, म्हणूनच यावर तातडीने चौकशी व कार्यवाही करावी जेणेकरुन योग्य दरास आणि दर्जात्मक ऑक्सिजन पुरवठा मुंबईकरांना त्वरित झाला पाहिजे, असे पक्षाचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबईत महानगरपालिकेचे २ ऑक्सिजन प्लांट सध्या कार्यरत असून आणखी १२ ठिकाणी महापालिकेद्वारे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने, स्पर्धात्मकरित्या व नियमानुसारच राबविण्यात आली आहे. परंतु, याबबत काही माध्यमातून व समाज माध्यमातून काही आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या खर्चापेक्षा कमी खर्चात इतर महापालिकांद्वारे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता लक्षात न घेता करण्यात आलेले हे आरोप असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने ते फेटाळून लावले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.