भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वच पंतप्रधानांनी देशाच्या विकासाला हातभार लावला असल्याचे मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी (०७ फेब्रुवारी) व्यक्त केले होते. पंतप्रधान हे एका पक्षाचे नसून सर्व देशाचे असतात, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) बुधवारी मीडियापुढे आले. मात्र, यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयाबाबत किंवा पुढील वाटचालीबाबत काहीही भाष्य केले नाही. (Sharad Pawar)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राज्यसभेत पंडित नेहरू यांच्यावर टिकास्त्र सोडले. नेहरू यांनी देशाच्या विकासासाठी काहीही केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना मागासवर्गीयांना आरक्षण द्यायचेच नव्हते, असेही सांगितले. (Sharad Pawar)
(हेही वाचा – Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार; शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आजचे राज्यसभेतील भाषण ऐकून फार दु:ख झाले असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या विद्यार्थी आघाडीच्यावतीनं शिक्षण आणि बेरोजगारी याबाबत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पवार बोलत होते. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community