Chhagan Bhujbal : भुजबळ तन आणि मनाने अजित पवार गटाचे आहेत का?

117
Chhagan Bhujbal : भुजबळ तन आणि मनाने अजित पवार गटाचे आहेत का?
Chhagan Bhujbal : भुजबळ तन आणि मनाने अजित पवार गटाचे आहेत का?

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये (DCM Ajit Pawar) खटके उडाल्याची बातमी नुकतीच आली होती. ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत या दोन्ही नेत्यांमध्ये खटके उडाल्याची बातमी समोर आली होती. मंत्रालयात फक्त आठ टक्के ओबीसी (OBC) कर्मचारी असल्याची बातमी छगन भुजबळ यांनी समोर आणली होती. यासंदर्भात भुजबळांनी सचिवांकडून आपण माहिती घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते. त्यावर सचिवांकडून अजित पवारांना ही माहिती चुकीची असल्याचे सांगण्यात आले. (Chhagan Bhujbal)

या बैठकीत ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा देखील आवाज चढवला होता. यादरम्यान बाचाबाचीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील आवाज चढल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या होत्या. यावर भुजबळांनी दोन भावांमध्ये जशी चर्चा होते तशीच चर्चा आमच्या दोघांमध्ये झाल्याचे बोलून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देखील मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फारकत घेत त्यांनी शिवसेना सोडली होती. जे भुजबळ ओबीसीच्या मुद्द्यावर शिवसेना सोडू शकतात ते खरंच मनापासून अजित पवार यांचे होतील का? हा प्रश्न उभा राहतो. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – Konkan Cyclone : कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज)

भुजबळ हे अत्यंत विपरित परिस्थितीतून स्वकर्तृत्वावर पुढे आलेले नेते आहेत. शिवसेनेनेही मोठी संधी दिली. मात्र, महत्त्वाकांक्षा नसेल तर राजकारण तरी पुढे कसे सरकरणार? तसं पाहता छगन भुजबळ हे अजित पवार यांना फार वरिष्ठ आहेत. त्यामुळेच १९९९ साली आघाडीच्या सरकारमध्ये भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री देखील बनवले होते. राजकारणामध्ये सर्वच नेते हे महत्त्वकांक्षी असतात. त्याचप्रमाणे भुजबळ देखील महत्त्वकांक्षी आहेत हे कोणापासूनही लपलेले नाही. (Chhagan Bhujbal)

तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी देशातील ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला होता. याला भाजप-शिवसेनेचा विरोध होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या या शिफारशी लागू केल्या. असं करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलं. शिवसेना-भाजपने याला प्रखर विरोध केला होता. त्यामुळे भुजबळ यांचे बाळासाहेब ठाकरेंशी मतभेद निर्माण झाले. त्यामुळे भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार फोडून भुजबळांनी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच आव्हान दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये रुजली. असा इतिहास असणारे छगन भुजबळ खरंच अजित पवारांबरोबर तन आणि मनाने राहणार का हा मोठा प्रश्न आहे. शरद पवारांपासून बाजूला होत निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील असोत किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे किती काळ अजित पवारांबरोबर राहतील हा मोठा प्रश्न आहे. (Chhagan Bhujbal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.