Chhagan Bhujbal : वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फुटू शकते – स्वराज्य संघटना

149
Chhagan Bhujbal : वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फुटू शकते - स्वराज्य संघटना

गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सतत चर्चेत आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून भुजबळ सतत वेगवेगळे विधानं करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी एक विधान केलं होतं. त्यावरून आता पुण्यातील स्वराज्य संघटना (Swarajya Sanghatana) आक्रमक झाली आहे.

स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीस धनंजय जाधव यांनी शासकीय विश्रामगृहात जाऊन छगन भुजबळांना थेट धमकी दिली आहे. आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका असे धनंजय जाधव म्हणाले. वेळ पडली तर भुजबळांची (Chhagan Bhujbal) गाडीही फुटू शकते, असा इशारा देखील धनंजय जाधव यांनी या वेळी दिला आहे.

(हेही वाचा – Jammu-Kashmir: काश्मीरात दहशतवाद्यांच्या ४ हस्तकांना अटक)

नेमकं प्रकरण काय ?

पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना चॅलेंज दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली व दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं. गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराही दिला. खुले चॅलेंज देऊन भुजबळांना व ओबीसी नेत्यांना धनंजय जाधव यांनी इशारा दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आतमध्ये कसं सोडलं? असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना उपस्थित केला. जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला आहे. भुजबळांच्या या भूमिकेला मराठा समाज कडाडून विरोध करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.