नवी मुंबईतील विमानतळाला स्थानिक नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी स्थानिक नागरिक गुरुवारी, २३ जून रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सायन-पनवेल मार्गावरील जड अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली आहे, तसेच हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. हा बदल २४ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहणार असल्याचे नवी मुंबईचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.
२४ जून रोजी मुंबई-पुणे महामार्गावर आंदोलन होणार!
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे, या विमानतळाला स्थानिक नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे, तर दुसरीकडे विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. या वादात सोमवारी राज ठाकरे यांनी उडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. मात्र गावकरी दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहेत, यासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि गावकरी २४ जून रोजी मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल येथे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे, तसेच या मार्गावरील सर्व वाहतूक एक दिवसासाठी बंद करण्यात आलेली असून जडअवजड वाहने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र हलक्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे.
(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदेशीर संपत्ती; ‘हा’ आमदार करणार ईडीकडे तक्रार)
कुठला मार्ग बंद राहणार आहे?
सायन – पनवेल महामार्गावरुन उरण फाटा ते खारघर दरम्यानच्या दोन्ही मार्गिकेवरील तसेच सीबीडी सर्कलकडे येणारे रस्ते, किल्ला जंक्शनकडून, सीबीडी महाकाली चौकाकडून, पार्क हॉटेलकडून व जुने महानगर पालिका कार्यालयाकडून या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
- मुंबई -पुणे मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
- मुंबईकडून येणारी वाहने ऐरोली टोलमार्गे – महापे – शिळफाटा या मार्गाने कळंबोली सर्कलमार्गे पुण्याकडे जातील.
- वाशी येथून पामबिच मार्गे – ऑरेजा सर्कल, बोनकोडे मार्गे, फायरब्रिगेड -महापेब्रिज – शिळफाटा मार्गे – कळंबोली सर्कलमार्गे पुण्याकडे जाईल.
मुंबई येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
- एक्सप्रेस-वेवरील वाहतूक पुरुषार्थ पेट्रोल पंप येथून उजवीकडे तळोजा एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडने रोपाली येथून डावीकडे वळण घेऊन शिळफाटा – महापे – एैरोली मार्गे मुंबईकडे जाईल.
- जुना पुणे – मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग
- पळस्पे फाटा – डी पाईट – कळंबोली सर्कल -शिळफाटा मार्गे – महापे -एैरोली टोल मार्गे मुंबईकडे जाईल.
नवी मुंबईमधून पुण्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग
- पामबीच मार्गे – ऑरेजा सर्कल – बोनकोडे मार्गे, फायरब्रिगेड – महानेब्रिज मार्ग – शिळफाटा मार्गे – कळंबोली सर्कलमार्गे पुण्याकडे जाईल.
- बेलापूर – ठाणे मार्गे फायरब्रिगेड – महापेब्रिज मार्गे – शिळफाटा मार्गे – मुंब्रा – पनवेल हायवेने पुण्याकडे जाईल.
(हेही वाचा : हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या त्या ‘मौलवीं’च्या मुसक्या आवळल्या! )
Join Our WhatsApp Community