पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात वाद; Bharat Gogawale यांच्याकडून नाराजीचा सूर

40
पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात वाद; Bharat Gogawale यांच्याकडून नाराजीचा सूर
पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात वाद; Bharat Gogawale यांच्याकडून नाराजीचा सूर

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी दावा केला असताना, हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची कन्या मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आले. या निर्णयावर गोगावले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. (Bharat Gogawale)

(हेही वाचा- मुंबईकरांना BEST Electricity चा झटका; तब्बल १५ टक्क्यांनी महागणार वीज)

गोगावले यांची तीव्र प्रतिक्रिया

पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना भरत गोगावले म्हणाले, “हा निर्णय अनपेक्षित आणि मनाला न पटणारा आहे. रायगड जिल्ह्याचे तीन शिवसेनेचे आणि तीन भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्रीपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आमच्या अपेक्षांना मान देऊन हा निर्णय व्हायला हवा होता. हा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही.” (Bharat Gogawale)

गोगावले यांनी यावर पुढे म्हटले की, “आमचे मंत्री आणि आमदार एकत्र मिळून आमचे नेते एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू.” (Bharat Gogawale)

सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

सुनील तटकरे यांनी हा निर्णय योग्य पद्धतीने घेतल्याचा दावा केला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. तिन्ही नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला असून, वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर ठेवून मंत्री आदिती तटकरे पालकमंत्री म्हणून काम करणार आहे.”  (Bharat Gogawale)

(हेही वाचा- Beed Accident: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरूणांना भरधाव ST बसने चिरडले)

शिवसैनिकांमध्ये नाराजी

रायगड जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयावर तीव्र नाराजी आहे. गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. “शिवसेनेचे आमदार असूनही पालकमंत्रीपद दिले गेले नाही, हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे,” असे शिवसैनिकांनी म्हटले आहे. (Bharat Gogawale)

रायगडमध्ये राजकीय तापमान वाढले

पालकमंत्रीपदावरून रायगड जिल्ह्यातील राजकीय वाद उफाळून आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. गोगावले यांनी मंत्रिमंडळाच्या वरिष्ठांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याने या वादाला अधिक धार येण्याची शक्यता आहे. (Bharat Gogawale)

(हेही वाचा- Hyderabad Metro धडधडतं हृदय घेऊन धावली; 13 मिनिटांत 13 किलोमीटरचा प्रवास केला पूर्ण)

नेतृत्वाचे आव्हान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, पालकमंत्रीपदाच्या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर नाराजी निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील राजकीय परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Bharat Gogawale)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.