- प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा कधीच आपल्या भाषणाचा भाग नव्हता, असे स्पष्ट करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महायुतीतील भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असल्याचे ठळकपणे नमूद करत अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य केले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. आता शेतकरी कर्जमाफीचा विषय अजित पवारांच्या भाषणात नव्हता, हे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे,” असे राऊत म्हणाले.
(हेही वाचा – Veer Savarkar : राष्ट्रप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’चे ११ जानेवारीला २ सत्रांत प्रसारण)
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त आश्वासनांची खैरात केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अजित पवारांच्या भाषणात नसेल, तर तो महायुतीच्या जाहीरनाम्यात का होता?” असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानामुळे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजित पवार आणि महायुती सरकारची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा राजकीय रणधुमाळीचे केंद्रबिंदू बनत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community