विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा वाढलेला आहे. कारण काँग्रेस आणि उबाठा यांच्यात मतभेद सुरु आहेत. या दोन्ही पक्षांत एकमत होताना दिसत नाही. जागा वाटपाच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खटके उडाल्याचे समजते. यादरम्यान ‘नाना पटोले असतील तर या पुढे जागावाटपाची बैठक होणार नाही,’ अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली असल्याचे बोलले जात आहे. या विधानावर दोन्ही बाजूने सारवासारव होत असताना उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असा काँग्रेसला इशारा दिला आहे.
(हेही वाचा Sanjay Shirsat यांचा मोठा आरोप : म्हणाले, उबाटा गटात तिकीटांसाठी…)
दरम्यान शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी संजय राऊत (Sanjay Raut) मातोश्री निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मविआतील जागावाटपाबद्दल तसेच कथित वादाबद्दल देखील भाष्य केले आहे. आमची काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये जागांचा पेच सुटत चालला आहे. एकत्र बसून गुंता सोडवायची जी मानसिकता लागते ती इच्छा आमच्या दोघांत आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक जागांवरचा तिढा आम्ही सोडवलेला आहे, अशा शब्दांत राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते रमेश चेन्नीथला शनिवारी मुंबईला येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतीलच, बघू पुढे काय होते. आणि ‘मी व्यक्तिगत कोणाविषयी बोललो नाही, मत मांडले नाही एवढी सभ्यता सुसंस्कृतपणा आमच्या मध्ये आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
काँग्रेस हा मोठा राजकीय पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. राष्ट्रीय पक्षांनी त्या त्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाला स्थान दिले पाहिजे. महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यांमधील प्रादेशिक पक्षामुळेच राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. यामुळेच मोदी देखील प्रधानमंत्री होऊ शकले. तर इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्त प्रादेशिक पक्ष आहे, असे देखील संजय राऊतांनी (Sanjay Raut) अधोरेखित केले आहे.
Join Our WhatsApp Community