महाविकास आघाडीत Mahavikas Aghadi मुख्यमंत्री पदावरून अधूनमधून मतभेद समोर येत असतात, कधी अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागतात, तर कधी काँग्रेसचे नेते बोलतात तेव्हा ठाकरे गट त्यावर नाराजी व्यक्त करतो, असे सातत्याने होत आहे. तरीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील मुख्यमंत्री पदावर बोलले, त्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी लागलीच त्यांना प्रत्युत्तर देत त्याचा प्रतिवाद केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले होते, त्यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असे विधान केले. जयंत पाटलांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीतील Mahavikas Aghadi नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, त्यासाठी आपण आधी एकत्र बसू…मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, याबाबत काहीही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे, हाही महाविकास आघाडीचाच Mahavikas Aghadi निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेतले जातील.
Join Our WhatsApp Community