बूस्टर डोससाठी प्रतीक्षा कालावधी झाला कमी! सरकारचा मोठा निर्णय

देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लागू करण्याच्या नियमात बदल केला आहे. बूस्टर डोस आता 9 ऐवजी 6 महिन्यांनंतर घेता येणार आहे.

१८ वयोगटापुढीलही घेऊ शकणार बूस्टर डोस 

आता कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्यांना बूस्टर डोससाठी 9 महिन्यांऐवजी 6 महिने किंवा 26 आठवडे वाट पाहावी लागणार आहे, तसेच 18 ते 59 वयोगटातील सर्व लोकांना आता 9 महिन्यांऐवजी 6 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. लसीकरणावरील सरकारची सल्लागार संस्था नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने  दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. याशिवाय  नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने 12 वर्षांखालील मुलांसाठी लसीकरणासाठी शिफारसी देखील दिल्या आहेत. बूस्टर म्हणून CORBEVAX चा वापर करण्यावर नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनकडून अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत 38 लाख 45 हजार लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

(हेही वाचा ‘माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही’, उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांकडे व्यक्त केल्या भावना)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here