दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह, म्हणाले…

137

देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा केला जात आहे. यासह या माहामारीने पुन्हा एकदा सर्वांना चिंतेत टाकण्यास सुरुवात केली आहे. सामान्यांपासून आता बड्या नेत्यांना कोरोनाने आपल्या विळख्य़ात घेण्यास सुरूवात केली आहे. अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांनी ट्वीट करत स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. ट्विट करून ही माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करत आयसोलेट होण्याचे आवाहन केले आहे. यापुढे ते असेही म्हणाले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सौम्य लक्षणं दिसच असून मी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी होम आयसोलेट होत कोरोना टेस्ट करावी.

गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि त्यांना संसर्ग झाल्यास स्वतःला वेगळे करावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन अंतर्गत लागोपाठ दोन दिवस संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्यास दिल्लीत रेड अलर्ट जारी करत कर्फ्यूची स्थिती निर्माण होईल, तसेच सर्व व्यवहार ठप्प केले जातील.

(हेही वाचा – राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणारा ‘समृद्धी महामार्ग’ प्रगतीसाठी ‘बुस्टर डोस’! वाचा वैशिष्ट्यं)

दिल्लीत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 6 टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. 3 जानेवारी रोजी देशाच्या राजधानीत 4,099 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या 6,288 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यासह, महानगरातील कंटेनमेंट झोन 2,008 पर्यंत वाढले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 84 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉन प्रकाराचे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.