मागील २ वर्षांपासून कोरोना या जागतिक महामारीने सर्वांचे जीवनमान बदलले आहे. त्यातच मास्क हा सर्वसामान्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग बनलेला आहे. त्याची सक्तीचे करण्यात आली आहे. जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक असल्याचे मानण्यात आले आहे. अशा वेळी ठाकरे सरकार मात्र मास्क हद्दपार करण्याच्या विचारात आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही करण्यात आली.
कोरोना टास्क फोर्सही चर्चा करणार
जोपर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत नाही, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. आपल्या देशातही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून अतिशय वेगाने लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 14 कोटी 69 लाख 57 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी 3 लाख 12 हजार 240 नागरिकांनी दुसरा तर 8 कोटी 59 लाख 17 हजार 37 पहिला डोस देण्यात आला आहे. आजच्या मंत्रीमंडळच्या बैठकीत मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार आहे.
(हेही वाचा एसटी बंद, प्रवाशांचे हाल, खासगी वाहनधारक मात्र मालामाल!)
कोणत्या देशांनी मास्क सक्ती हटवली?
संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता. इस्रायलने अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्याने तिथे पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. अलीकडेच सौदी अरेबियानेही लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे.
Join Our WhatsApp Community