आता अनिल परबांचा ३०० कोटी बदली घोटाळा?

परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील एकामागोमाग एक मंत्री अडचणीत सापडत आहे. विशेष म्हणजे त्या खात्यातीलच अधिकारी संबंधित मंत्र्यांच्याकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत तक्रारी करत आहेत. नुकतेच माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे १०० कोटीची वसुलीचे टार्गेट देतात, असा गौप्यस्फोट केल्याने देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावा लागला. आता परिवहन मंत्री अनिल परब हे पदोन्नतीसाठी पैसे घेतात अशी तक्रार खात्यातील अधिकाऱ्याने केल्याने अनिल परब अडचणीत सापडले आहेत.

नाशिक पोलिस ठाण्यात तक्रार! 

परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा या तक्रारीत म्हटले आहे.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळा! “वीर सावरकर धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ होते!” )

५ दिवसांत चौकशी पूर्ण होणार! 

या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलिस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अनिल परब यांनी पायउतार व्हावे! – संदीप देशपांडे

यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदापासून पायउतार होऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे. १०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?, असे संदीप देशपांडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here