Corruption : ‘पगारात भागवा’ अभियान : प्रामाणिकतेचा संकल्प आणि राज्य विकासाचा ध्यास

38
Corruption : 'पगारात भागवा' अभियान : प्रामाणिकतेचा संकल्प आणि राज्य विकासाचा ध्यास
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘पगारात भागवा’ हे अभियान सुरू केले आहे. राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जनसेवेच्या भावनेला प्रोत्साहन देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. प्रशासन भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. (Corruption)

महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले की, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पगारात समाधान मानून प्रामाणिकपणाचा संकल्प करावा. यामुळे प्रशासनात पारदर्शकता येईल आणि जनतेच्या मनातील नकारात्मक भावना दूर होतील. ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी अधिकारी बांधवांनी कर्तव्यदक्षता, सचोटी आणि सेवाभाव अंगीकारण्याची गरज आहे. (Corruption)

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा रणजी खेळणार म्हटल्यावर एमसीएची प्रेक्षकांच्या खुर्च्या वाढवण्याची धावपळ )

या मोहिमेत १० सूत्रांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, लोकसेवक म्हणून प्रत्येकाने संवेदनशीलतेने काम करावे, असे महासंघाने आवाहन केले आहे. शासकीय कामकाजात जनतेशी सौजन्याने वागणे, त्यांच्या कामांसाठी अडथळा न आणणे, आणि नियमांनुसार त्वरित कार्यवाही करणे यावर भर देण्यात येईल. पगारात समाधान मानल्याने आत्मसन्मान, मनःशांती आणि समाजमानसन्मान मिळतो, तसेच पुढच्या पिढीवर सकारात्मक संस्कार होतात, असे महासंघाने म्हटले आहे. (Corruption)

हा उपक्रम कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नवा अध्याय ठरेल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल, असा महासंघाचा विश्वास आहे. ‘पगारात भागवा’ अभियान केवळ प्रशासन सुधारण्याचा नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा पायाच ठरेल. (Corruption)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.