देशातील नक्षलवादाचे काऊंटडाऊन सुरु; Modi Government ने घेतला महत्वाचा निर्णय

162

येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 15 दिवसांपूर्वी केली होती. या दिशेने केंद्रानेही आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) हजारो सैनिक छत्तीसगडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करणे, हे एकच ध्येय त्यांचे असेल.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नक्षलवाद्यांना अंतिम मुदत जाहीर करताना, देशाला डाव्या विचारसरणीपासून मुक्त करण्यासाठी ‘मजबूत आणि निर्दयी’ कृती आवश्यक असल्याचे म्हटले होते.

(हेही वाचा Muslim : उत्तराखंडच्या अनेक गावात मुसलमानांना प्रवेश बंदी, गावकऱ्यांनी चक्क लावले फलक)

अखेरचा निर्णायक लढा सुरू

त्यानुसार, छत्तीसगडमधील सर्वाधिक नक्षल-हिंसाग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये सीआरपीएफ 4,000 हून अधिक जवानांसह चार बटालियन तैनात करणार आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याच्या केंद्र सरकारच्या (Modi Government) घोषणेनंतर आता अखेरचा निर्णायक लढा सुरू झाला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) झारखंडमधून तीन आणि बिहारमधून एक बटालियन परत बोलावली आहे. राज्याची राजधानी रायपूरच्या दक्षिणेस सुमारे 450 ते 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तर भागात या तुकड्या तैनात केल्या जातील. या दोन राज्यांमध्ये (झारखंड आणि बिहार) नक्षलवादी कारवाया बंद किंवा नगण्य झाल्या आहेत. त्यामुळे या बटालियनचा छत्तीसगडमध्ये अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे, सीआरपीएफच्या एका बटालियनमध्ये सुमारे एक हजार जवान आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि सुकमा या दुर्गम जिल्ह्यांमध्ये, तसेच ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या त्रि-सीमेवरील दुर्गम ठिकाणी या तुकड्या तैनात केल्या जात आहेत. सीआरपीएफच्या कोब्रा युनिट्ससह या बटालियन जिल्ह्यांच्या दुर्गम भागात अधिक फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) स्थापन करतील, जेणेकरून क्षेत्र सुरक्षित केल्यानंतर विकास कार्य सुरू करता येईल. या नवीन युनिट्सना चिलखती वाहने, UAVs (मानवरहित हवाई वाहने), श्वानपथक, दळणवळण संच आणि रेशन पुरवठ्याद्वारे रसद सहाय्य प्रदान केले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.