“कोर्टाच्या तारखा लवकर मिळतात, पण एमआरआय आणि सिटी स्कॅनच्या तारखा मिळत नाहीत,” अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तर तासात अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अशी परिस्थिती नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या उत्तरावर अनेक आमदारांनी आक्षेप घेतला.
(हेही वाचा – मंत्री Hasan Mushrif यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला दिली सोडचिठ्ठी; म्हणाले, आता मला…)
विरोधकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी स्वतःच्या मतदारसंघातील परिस्थिती सांगत सरकारी रुग्णालयांमध्ये एमआरआय आणि सिटी स्कॅनसाठी रुग्णांना मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटल (St. George’s Hospital), जी.टी. इस्पितळ (G.T. Hospital) आणि सर जे.जे. इस्पितळातील (Sir J.J. Hospital) स्थितीवरही प्रकाश टाकला.
या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, यासाठी लवकरच सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देशही नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिले. सरकारी रुग्णालयांमध्ये मूलभूत वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासन कोणते पाऊल उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community