जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर!

128

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली होती यानंतर शनिवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. परंतु आता आव्हाडांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून न्यायालयाने आव्हाडांच्या वकिलांचा अर्ज मान्य केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

( हेही वाचा : पुणे तिथे काय उणे! PMPML बसचा थेट Google सोबत करार; प्रवाशांना मिळणार ‘या’ नव्या सुविधा )

न्यायधीश बी. एस. पाल यांनी अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तपासात सहकार्य करणे, तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीला जाणे, साक्षीदारांशी संपर्क करू नये, तपासात बाधा आणू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात सोमवारी रात्री हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू होता. शो सुरू असताना, जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत चित्रपटगृहात गेले आणि त्यांनी चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत शो बंद केला. तसेच चित्रपटगृहातील प्रेक्षकांना निघून जाण्यास सांगितले. जमावातील काही जणांनी मारहाण केल्याची तक्रार चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या ठाण्यातील व्यावसायिक परीक्षित दुर्वे यांनी केली होती. यानंतर शो बंद पडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव पोहोचले, त्यांना हा शो पुन्हा सुरू केला.

तक्रारीनंतर आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्त्यांविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आव्हाडांना शुक्रवारी बोलवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.