Vibhav Kumar च्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय राखीव

123
Vibhav Kumar च्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय राखीव

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (३१ मे) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. विभवने बुधवारी (२९ मे) आपली अटक बेकायदेशीर ठरवून नुकसान भरपाई आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. (Vibhav Kumar)

न्यायमूर्ती शर्मा यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिस आणि विभव कुमारच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने विभवच्या याचिकेवर आधी सुनावणी करायची होती. मात्र, न्यायमूर्ती चावला यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती शर्मा यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले. (Vibhav Kumar)

(हेही वाचा – Arvind Kejriwal: जामीन मुदत संपत येताच केजरीवालांचा आजार वाढला!)

दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे वकील संजय जैन यांनी सुनावणीदरम्यान विभवच्या याचिकेवर आक्षेप घेत ती सुनावणीच्या लायक नसल्याचे सांगितले. विभवचे वकील एन हरिहरन यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी अटक मेमो आणि अटकेचे कारण उघड केलेले नाही. ही बाब वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, जी कमी लेखली जाऊ नये. (Vibhav Kumar)

दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने २७ मे रोजी विभवचा जामीन अर्ज फेटाळला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ मे रोजी न्यायालयाने विभवला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विभववर ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर सीएम हाऊसमध्ये हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याला १८ मे रोजी सीएम हाऊसमधून अटक करण्यात आली होती. (Vibhav Kumar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.