समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांना ‘Hate Speech’ प्रकरणी मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 1000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
आझम खान यांच्यावर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आझम खान यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तत्कालीन रामपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण 2019 चे आहे जेव्हा आझम खान सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान शहजाद नगर पोलीस स्टेशन परिसरातील धामोरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तत्कालीन रामपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधत प्रक्षोभक भाषण केले होते.
या निवडणुकीत समाजवादी पक्ष (एसपी) आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष (बसपा) एकत्र लढले होते. त्यावेळी आझम खान रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपा युतीचे उमेदवार होते. ही बाब समोर आल्यानंतर एडीओ पंचायत अनिल चौहान यांनी आझम खानविरोधात शहजाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
Join Our WhatsApp Community