सध्या कोरोनाचा संसर्ग कायम आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेने जोवर कोरोना असेल, तोवर साहित्य संमेलन होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
साहित्य परिषदेचे ‘वेट अँड वॉच’!
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंबंधी महत्वाचे निर्णय जाहीर केले. यंदाच्या नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भौतिक शास्त्रज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक जयंत नारळीकर हे आहेत. मात्र, कोरोनामुळे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र नाशिक साहित्य संमेलन स्वागत मंडळ आणि साहित्य मंडळ सदस्य यांनी मात्र संमेलन व्हावे यासाठी आग्रह धरला आहे. लोकांचा मान राखून साहित्य संमेलन झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका नाशिककरांनी घेतली आहे, परंतु जोवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, सरकार परवानगी देत नाही, तोवर संमेलन आयोजित करता येणार नाही, असे ठाले पाटील म्हणाले.
(हेही वाचा : तुम्हीच लिहा स्वातंत्र्यदिनाचे माझे भाषण! मोदींचे जनतेला ‘हे’ आहे आवाहन!)
ऑनलाईन संमेलन होणार नाही!
कोरोनास्थितीमुळे सध्या बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल का? या प्रश्नावर ठाले यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित केले जाणार नाही, असे सांगितले आहे. तसेच ऑनलाईन संमेलन हे संकल्पनेत बसत नाही. लोकांना पुस्तक खरेदी करावे लागतात, असे ठाले यांनी म्हटले. ९३वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे १०,११ आणि १२ जानेवारी २०२० दरम्यान उस्मानाबाद येथे पार पडले. वास्तविक तेव्हाही कोरोनाचा प्रादुर्भाव होता. तरीही संमेलन घेण्यात आले होते. त्या धर्तीवर यंदाच्या संमेलनाबाबतही निर्णय घेण्याची विनंती होऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community