राज्यातील निर्बंध शिथिल होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राज्यातील रुग्ण स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

88

कोरोना रुग्णसंख्या कमालीची घटल्याने राज्यात लागू केलेले निर्बंध येत्या १ ऑगस्टपासून काही प्रमाणात शिथिल करण्याबाबतची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मंत्रीमंडळ बैठकीत यावर बराच खल झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील रुग्ण स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. दुकानांच्या वेळा आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लोकल सामांन्यांसाठी सुरू करण्याबाबत यावेळी विचार केला जाणार आहे.

निर्बंध होणार शिथिल?

कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यात रुग्णसंख्या आणि संसर्ग दर कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली. यानुसार येत्या १ तारखेपासून सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जातील, असे बोलले जात आहे.

(हेही वाचाः लसीकरणाची बदललेली वेळ कोणती? जाणून घ्या!)

काय सुरू होणार?

सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेले जिल्हे वगळता, इतर ठिकाणी निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. तसेच शाळा-महाविद्यालये, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा, लसींचे दोन डोस घेतलेल्यांना सुरू करण्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स समिती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी गुरुवारी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

लोकल प्रवासाची टांगती तलवार

राज्यातील कोरोना स्थितीचा मंत्रीमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होईल. मात्र लोकल प्रवासाची मागणी होत असली तरी, लगेचच प्रवासाला अनुमती मिळण्याची शक्यता कमीच आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचाः सायक्लॉन शेल्टर उभारणीत राज्य सरकारची हलगर्जी भोवली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.