मुख्यमंत्र्यांच्या औरंबागाद मधील सभेसाठी कोरोना चाचणी बंधनकारक?

95

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना आता या सभेबाबत मोठी माहिती समोर येत आहे. या सभेसाठी मंचावर उपस्थित सर्वांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री वगळता मंचावरील सर्वांनाच कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता निर्णय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या सभेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री वगळता मंचावर उपस्थित असणा-या सर्वांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंचावरील सर्व शिवसेना नेते आणि पदाधिका-यांना कोरोना चाचणी करणे आवश्यक असणार आहे.

(हेही वाचाः राज्यसभा निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत कोणाला? राज ठाकरेंचा निर्णय)

मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार?

मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बुधवारी संध्याकाळी सभा होणार आहे. या सभेला पोलिसांकडून 15 अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे ज्याठिकाणी सभा झाली होती, त्याच ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही सभा होणार असल्याने उद्धव ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.