माजी आमदार आनंदराव गेडामांच्या मुलाकडून कोविड योद्धा डॉक्टरला मारहाण!

या आधीही या माजी आमदाराचा मुलगा विधानसभा निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अपहरणाच्या गुन्ह्यात फरार होता.

 सध्या राज्यात एक बाजूला वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. डॉक्टर, नर्सेस दिवस-रात्र रुग्ण सेवा करत आहेत. अशा वेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र अशा कोविड डॉक्टरांना मारहाण करणे, त्यांना अपशब्द बोलणे हे सुरु झाले असून, त्यांच्या या झुंडशाहीला महाविकास आघाडी सरकार वेसण घालणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. कारण काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरला बेदम मारहाण केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे हे प्रकरण? 

  • कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोविड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ. अभिजित मारबते यांना गुरुवारी, १३ एप्रिल रोजी मारहाण केली. त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी देवळीचे आमदार रणजित कांबळे यांचे वर्धाच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून अपशब्द वापरून केलेले संभाषण ताजे असतांनाच काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राने सरळ कोरोना बाधितांच्या सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हात उचलणे कशाचे द्योतक आहे?
  • या आधीही या माजी आमदाराचा मुलगा विधानसभा निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अपहरणाच्या गुन्ह्यात फरार होता. येनकेनप्रकारेण हे प्रकरण शमत नाही तोच हे प्रकरण झाल्याने महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झुंडशाहीला वाव मिळतो आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
  • आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयपीसी आणि महाराष्ट्र शासन सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार आणि नुकसान किंवा मालमत्ता हानीचा प्रतिबंध) अधिनियमातील कठोर, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंदविला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा : राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम… असे आहेत नियम!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here