सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र

138

निलंबित खासदारांपैकी सीपीआयच्या एका खासदाराने या निलंबित खासदारांच्यावतीने वीर सावरकर यांच्या संबंधी अवमानकारक वक्तव्य केले.  या निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेचे दोन खासदार आहेत. त्यांनी त्यावर अवाक्षरही काढले नाही. तसेच शिवसेना नेतृत्त्वाकडूनही याचा खुलासा करण्यात आला नाही. याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर ‘सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना सावरकर विरोधी बनली आहे’, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

शिवसेना एकीकडे स्वत:ला सावरकर प्रेमी म्हणवून घेते, पण संसदेत वीर सावरकरांच्या अवमानावर मुकसंमती देत असल्याने त्यांच्या या दुटप्पी भूमिकेचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेचं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील प्रेम किती बेगडी आहे, हे यातून दिसून येतं आहे… काँग्रेसची मर्जी राखण्यासाठी सावरकरांचा अपमान केला जात आहे…सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना सावरकर विरोधी बनली आहे…राज्यात दारू स्वस्त केल्यानंतर सत्ताधा-यांमध्ये हा बदल दिसून येत आहे…असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 

 (हेही वाचा: साईबाबा संस्थानाकडे फक्त मंदिर देखभाल )

उद्धव ठाकरे सत्तेला चिकटलेले

यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही यावर तीव्र शब्दांत विरोध केला आहे. मणीशंकर अय्यर यांनी जेव्हा सावरकरांचा अवमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी जोडे मारले होते आणि आता मात्र उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून आहेत, अशा आशयाचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

29 नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 11 ऑगस्ट 2021 ला पावसाळी अधिवेशनात शिस्तभंग आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी 12 खासदारांना निलंबित करण्यात आले होते, त्याबाबत विरोधी पक्षांनी सभागृहाचा सभात्याग केला. या निलंबित खासदारांत शिवसेनेच्या प्रियांका चतूर्वेदी आणि तृणमूल काॅंग्रेसचे डोला सेन यांचा समावेश आहे. त्यानंतर  या निलंबित खासदारांपैकी एक भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (सीपीआय) खासदार बिनाॅय विश्वम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘आमची माफी मागण्याची कोणतीही योजना नाही, कसली माफी? माफी मागायला आम्ही काही सावरकर नाही. माफीची पत्रे लिहिणे ही आमची संस्कृती नाही.’ त्यांच्या या वक्तव्यापासून आता  सेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई या शिवसेना खासदारांनी स्वत:ला दूर केले आहे. शिवसेना या मुद्द्यावर मात्र मुकसंमतीदार बनली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.