दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; PM Modi यांच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना सूचना

PM Modi : बुधवार, ३ जुलै रोजी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत. या कॅबिनेट कमिटीमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाचा समावेश आहे.

255
दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; PM Modi यांच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना सूचना
दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; PM Modi यांच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना सूचना

मोदी सरकारने देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बुधवार, ३ जुलै रोजी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत. या कॅबिनेट कमिटीमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाचा समावेश असून यामध्ये पंतप्रधान मोदींसह (PM Modi), संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, सांस्कृतिकमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, हरदीपसिंग पुरी आणि कामगार-रोजगारमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

(हेही वाचा – Vidarbha Ashadhi Special Train: विदर्भकरांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या आषाढीवारीसाठी विशेष रेल्वे गाड्या )

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) निकालांवर बेरोजगारी आणि संविधान रद्द करण्याच्या मुद्द्याचा मोठा परिणाम झाला आहे, हे विशेष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून रोजगार वाढविण्यासाठी धोरणे बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा संपूर्ण भर एका वर्षात ५० लाख नोकऱ्या वाढविण्यावर आहे. यातील सर्वांत जास्त संख्या संरक्षण, रेल्वे, पोस्ट आणि तार मंत्रालयाकडून आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाला रोजगार वाढवण्यासाठी संपूर्ण नेटवर्क तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.