आर्थर रोड जेलमध्ये ९ विशेष बॅरेकची निर्मिती, अशी असणार सुविधा

89

मुंबईतील आर्थर रोड मद्यवर्ती कारागृहात ९ नवीन बॅरेक तयार करण्यात येत आहे. हे नवीन बॅरेकची ओळख व्हीआयपी बॅरेक म्हणून असणार आहे. आर्थर रोड तुरुंगातील वाढती कैद्यांची संख्या पहाता कारागृहात नवीन बॅरेक तयार करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधिकारी यांनी म्हटले आहे. मात्र व्हीआयपी बॅरेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवीन बॅरेक तयारी कुठल्या नवीन व्हीआयपी कैद्यासाठी केली जात आहे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

मुंबईतील आर्थर रोड मद्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, दाऊद टोळीतील गँगस्टर, बडे उद्योगपती, राजकारणी आणि अतिरेकी अजमल कसाब यांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक झाली, व त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली त्या त्या वेळी आर्थर रोड कारागृह चर्चेत आलेले आहे. दरम्यान ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक आणि काही आठवड्यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

(हेही वाचा – तब्बल ४ हजार लीटर केमिकलयुक्त दूध जप्त! गुजरातमधून दोघांना अटक)

अशी असणार सुविधा

आर्थर रोड कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले ते नवीन व्हीआयपी बॅरेकमुळे २ एकरमध्ये विस्तारलेल्या आर्थर रोड कारागृहात ९ नवीन बॅरेक तयार करण्यात येत आहे. हे बॅरेक सामान्य बॅरेक नसून व्हीआयपी बॅरेक करण्यात येणार आहे. या बॅरेक मध्ये पाश्चिमात्य टॉयलेट, टेलिव्हिजन सेट, पंखे, उशी, बेड इत्यादी सुविधा असणार आहे. तसेच बॅरेकमध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी खास सुविधा करण्यात येणार आहे. व्हीआयपी बॅरेक तयार करण्यामागे काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे, आणखी काही घोटाळेबाज नेते, उदयोगपतीना अटक करण्यात येणार असल्याचे व त्यांची रवानगी या व्हीआयपी बॅरेकमध्ये करण्यात येणार आहे का? अशी चर्चा सुरू आहे.

२०१९ मध्ये नवीन बॅरेकला मंजुरी

मात्र याबाबत कारागृह प्रशासनाने इन्कार केला असून नवीन बॅरेक करण्याचा प्रस्ताव हा जुना असून २०१९ मध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, व सप्टेंबर २०२० मध्ये या बॅरेकचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आर्थर रोड करगृहात क्षमतेपेक्षा तीन पटीने कैदी भरले गेले आहे, करगृहातील कैद्यांची क्षमता वाढविण्यासाठी हे बॅरेक बांधण्यात येत आहे. या बॅरेकमध्ये सामान्य बॅरेक सारखीच रचना असणार आहे, केवळ या ठिकाणी टॉयलेटचे भांडे हे पाश्चिमात्य असेल, बॅरेक मध्ये वातानुकूलितची सुविधा नसणार आहे, केवळ पंखे लावण्यात येईल, इतर बॅरेक मध्ये ज्या पद्धतीने टेलिव्हिजन संच आहे तसाच संच या बॅरेक मध्ये असणार असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.