सध्या इस्त्रायल आणि गाझामधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी इस्त्रायलने Rafah शहरावर हल्ले केले आहेत, मात्र त्यात जखमी लहान मुलांचे व्हिडिओ एखाद्या टूलकिटच्या रुपाने जगभर पसरवले जात असून पॅलेस्टिन यामाध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला भारतातील बॉलिवूड बबळी पडला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी ‘All eyes on Rafah’ या X वरील ट्रेंडला पाठिंबा देण्यासाठी अक्षरशः चढाओढ लावली आहे. या सगळ्यांना आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या राहुल तेवतिया यांनी जोरदार चपराक लगावली आहे.
राहुल तेवतिया यांनी पाकिस्तानातील अत्याचार आणि अत्याचाराला बळी पडलेल्या ‘हिंदू’चा आवाज उठवला आहे. राहुल तेवतिया यांनी ‘All eyes on Rafah’ पेक्षा ‘All eyes on hindus in pakistan’ निवडले आणि पाकिस्तानमध्ये छळ आणि दडपशाहीला बळी पडलेल्या हिंदूंच्या दुर्दशेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. त्यांनी Argument_India ची इन्स्टाग्राम पोस्ट हे त्यांचे इंस्टाग्राम स्टेटस म्हणून केले. या पोस्टमध्ये पाकिस्तानमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराशी संबंधित तथ्ये देण्यात आली आहेत.
View this post on Instagram
तेवतिया यांनी काय म्हटले?
Fact_India च्या इंस्टाग्राम पोस्ट ज्यामध्ये राहुल तेवाटिया यांनी त्यांचे स्टेटस केले आहे, त्यात म्हटले आहे, ‘पाकिस्तानमधील प्रत्येक तिसरी हिंदू अल्पवयीन मुलगी बलात्काराची शिकार आहे. पाकिस्तानमध्ये त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही तर त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली जाते. जागतिक मीडिया, भारतीय सेलिब्रिटी आणि मानवाधिकार संघटना या महत्त्वाच्या मुद्द्यावर गप्प का आहेत? ‘रफाहमध्ये ४६ लोक मारले गेले, जगभरातील मीडिया अश्रू ढाळू लागला, पण काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेशात लाखो हिंदूंना क्रूर नरसंहाराचे बळी बनवले गेले, ते कोणीही मान्य केले नाही. ‘या पोस्टच्या पुढील स्लाइड्समध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचे वर्णन आहे. राहुल तेवातिया यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्टेटस म्हणून टाकली आहे. राहुल तेवातियाच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टने संपूर्ण इकोसिस्टम उद्ध्वस्त केली आहे.
Join Our WhatsApp Community