उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या आमदारकीवर धोक्याची टांगती तलवार आहे. त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. (MLA Pravin Swami)
(हेही वाचा- PM Narendra Modi मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर; युद्धनौकांचे लोकार्पण, मंदिराचे उद्घाटन, आमदारांशी साधणार संवाद)
या याचिकेमध्ये आमदार प्रवीण स्वामी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, आमदार स्वामी यांनी खोट्या माहितीसह जातप्रमाणपत्र मिळवले आणि त्याचा गैरफायदा घेत निवडणूक लढवली. (MLA Pravin Swami)
नेमके प्रकरण काय?
प्रवीण स्वामी हे अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करून उमरगा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र नियमांनुसार वैध नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आरोप केला आहे की, स्वामी यांनी बनावट माहितीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवले आणि निवडणुकीत अर्ज सादर केला. (MLA Pravin Swami)
(हेही वाचा- CISF च्या 2 नवीन बटालियन्सना गृह मंत्रालयांची मान्यता, हजारो तरुणांना मिळणार नोकऱ्या)
याचिकेमध्ये, प्रवीण स्वामी यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, कारण जर प्रमाणपत्र वैध नसल्याचे सिद्ध झाले, तर निवडणूक कायद्याच्या नियमांनुसार त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. (MLA Pravin Swami)
न्यायालयीन प्रक्रिया सुरू
मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. याचिकाकर्त्यांनी आपले मुद्दे मांडले असून, न्यायालयाने संबंधित सरकारी यंत्रणांकडून माहिती मागवली आहे. पुढील सुनावणीच्या तारखेला अधिकृत निर्णय येण्याची शक्यता आहे. (MLA Pravin Swami)
(हेही वाचा- कॉल येताच वाटते भीती; Gen Z किड्समध्ये वाढतोय ‘टेलिफोनोफोबिया’; नेमकं प्रकरण आहे तरी काय?)
राजकीय परिणाम
जर प्रवीण स्वामी यांचे प्रमाणपत्र खोटे ठरले, तर उमरगा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा सामना करावा लागणार आहे. या प्रकरणामुळे उमरग्यात राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर स्वामी यांना लक्ष केले आहे. (MLA Pravin Swami)
आता न्यायालयाच्या निर्णयावर या प्रकरणाचा अंतिम निकाल अवलंबून आहे. प्रवीण स्वामी यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना, आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे. (MLA Pravin Swami)
हेही पहा-