मंगेशकर कुटुंबावर टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद; खासदार Sunil Tatkare यांची तीव्र प्रतिक्रिया

86
मंगेशकर कुटुंबावर टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद; खासदार Sunil Tatkare यांची तीव्र प्रतिक्रिया
  • प्रतिनिधी

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह आणि लांच्छनास्पद असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केली आहे. मंगेशकर कुटुंबाने देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्याविषयी अवमानकारक विधाने करणे हे भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांनी भारतीय संगीताला जागतिक पातळीवर नेऊन देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संस्कार लाभलेल्या या कुटुंबाने सांस्कृतिक ठेवा जपला आणि समृद्ध केला. अशा कुटुंबाविषयी अवमानकारक शब्द वापरणे हे भारतीय संस्कृतीच्या मूल्यांच्या विरोधात आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “प्रसिद्धीसाठी मुद्दाम अशी विधाने करणे ही अत्यंत हलकी आणि फुटकळ वृत्ती आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपले शब्द आणि विचार जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. मंगेशकर कुटुंबासारख्या प्रतिष्ठित आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कुटुंबावर अनावश्यक आरोप करणे पूर्णपणे निषेधार्ह आहे.”


(हेही वाचा – Mangeshkar Family ला केले जाते जाणीवपूर्वक टार्गेट; गोवा मुक्ती संग्रामातील योगदानाकडे सोयीस्कर दुर्लक्ष)

मंगेशकर कुटुंब हा देशाचा अभिमान

विरोधकांना इशारा देताना तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, “मंगेशकर कुटुंब हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या सांस्कृतिक उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे अशा कुटुंबाविषयी बोलताना संयम, संवेदनशीलता आणि आदर राखणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी त्यांचे नाव बदनाम करणे चुकीचे आहे.”

पुण्यातील रुग्णालय प्रकरणावर कठोर कारवाईचे आदेश

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना तटकरे (Sunil Tatkare) यांनी ती संतापजनक आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले. या प्रकरणी राज्य सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. “रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी शासनाने दिलेल्या सवलतींचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक खासगी रुग्णालयाचे कर्तव्य आहे. जर या सवलती नाकारल्या जात असतील, तर संबंधित रुग्णालय, प्रशासन आणि जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

(हेही वाचा – Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेल्या विनेश फोगाटला हरयाणा सरकारकडून ४ कोटी रुपये)

सांस्कृतिक वारशाचा आदर ठेवण्याचे आवाहन

मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाचा गौरव करताना तटकरे (Sunil Tatkare) यांनी सर्वांना सांस्कृतिक वारसा जपण्याचे आणि आदर राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यमुळे मंगेशकर कुटुंबावर टीका करणाऱ्यांना चपराक बसली असून, समाजात सकारात्मक संदेश पोहोचण्याची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.