MLA Manisha Kayande: राहुल गांधींची सभा म्हणजे ‘न्याय यात्रे’ची नौंटकी, आमदार मनीषा कायंदे यांची टिका

152
MLA Manisha Kayande: राहुल गांधींची सभा म्हणजे 'न्याय यात्रे'ची नौंटकी, आमदार मनीषा कायंदे यांची टिका

भारत जोडो न्याय यात्रेची सभा रविवारी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची ही सभा म्हणजे न्याय यात्रेची नौंटकी म्हणजेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती देण्याची कृती उबाठा गट करीत आहे, अशी टिका आमदार मनीषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी केली आहे.

मनीषा कायंदे (MLA Manisha Kayande) म्हणाल्या की, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान शीवतीर्थ म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे समीकरण आहे. याच शीवतीर्थावरून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या हुकूमशाहीच्या विरोधात मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. रविवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर संबोधणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासमोर होणार असल्याने उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना या स्मारकात घेऊन जातील का ? असा सवाल शिवसेना सचिव, प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विचारला आहे.

(हेही वाचा – Ashish Shelar: भाजपा नेते आशिष शेलार यांचा ट्विटरद्वारे ठाकरेंना खोचक टोला, भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं)

मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली खंत…
‘मेरा नाम सावरकर नही’, असे छातीठोकपणे म्हणणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीच्या दिवशी ट्विट करत नाहीत. तेच राहुल गांधी जर आज शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर चुकून गेलेच, तर तो हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाणूनबुजून केलेला अपमान असेल, अशी खंतही शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.