Cross voting case : हिमाचल प्रदेश येथील काँग्रेसचे ६ आमदार अपात्र

ज्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले त्यामध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. मात्र या कारवाईनंतरही हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारवर आलेले संकट टळलेले नाही.

173
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचा जाहीरनामा; ५ न्याय, २५ गॅरेंटीचे न्यायपत्र जाहीर

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग (Cross voting case) करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र (disqualified) ठरवण्यात आले आहे. या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा लज्जास्पद पराभव झाला होता.

(हेही वाचा – BCCI Test Fees : कसोटी क्रिकेटचा मोबदला आयपीएल एवढा करण्याचा बीसीसीआयचा विचार)

काँग्रेसच्या सरकारवर आलेले संकट टळलेले नाही :

हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी या सहा बंडखोर आमदारांना अपात्र (disqualified) ठरवले आहे. या कारवाईबाबत माहिती देताना विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी सांगितले की, या आमदारांनी (Cross voting case) निवडणूक काँग्रेसकडून लढवली, मात्र पक्षाच्या व्हिपचे पालन केले नाही, व्हिपचे उल्लंघन करून त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केले नाही. त्यानंतर मी सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतली. ज्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले त्यामध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. मात्र या कारवाईनंतरही हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारवर आलेले संकट टळलेले नाही. गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या नाश्त्याच्या कार्यक्रमाला ४ आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासमोरील आव्हान कायम आहे. विक्रमादित्य सिंह, मोहन लाल, नंद लाल आमि धनिराम हे आमदार मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे. (Cross voting case)

(हेही वाचा – America – Maharashtra : अमेरिका – महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार)

राज्यसभा निवडणूक :

हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या (Cross voting case) एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले. तसेच काँग्रेसच्या सहा आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या ३ अशा ९ आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी आणि भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन यांची प्रत्येकी ३४ – ३४ मते झाली होती. त्यानंतर भाजपाचे हर्ष महाजन यांचा विजय झाला. (Cross voting case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.